Psalms 58

1अहो मनुष्याच्या मुलांनो, तुम्ही खरोखर न्याय करता का?
तुम्ही सरळपणे न्याय करता का?
2नाही, तुम्ही हृदयात दुष्टपणाचे काम करता;
तुम्ही पृथ्वीवर आपल्या हाताने हिंसा तोलून देता.

3दुष्ट उदरापासूनच दुरावतात;

ते जन्मल्यापासूनच खोटे बोलून बहकून जातात.
4त्यांचे विष सापाच्या विषासारखे आहे,
ते बहिरा जोगी साप आपले कान झाकतो त्याच्यासारखे आहेत;
5जो गारुडी कितीही कुशलतेने मंत्र घालू लागला तरी
त्याच्या वाणीकडे तो लक्ष देत नाही, त्यासारखे ते आहेत.

6हे देवा, त्यांचे दात त्यांच्या मुखात पाड;

हे परमेश्वरा तरुण सिंहाचे दाढा पाडून टाक;
7जसे जोरात वाहणारे पाणी नाहीसे होते तसे ते नाहीसे होवोत;
जेव्हा ते आपले तीर मारतील तेव्हा त्यांना टोक नसल्यासारखे ते होवोत.
8गोगलगायीप्रमाणे ते होवोत जशी ती विरघळते आणि नाहीशी होते,
जर अवेळी जन्मलेल्या स्रीचा गर्भ त्याला कधी सूर्य प्रकाश दिसत नाही त्याप्रमाणे ते होवोत.

9तुमच्या भांड्यास काटेऱ्या जळणाची आंच लागण्यापूर्वीच,

ते हिरवे असो वा सुकलेले, दुष्ट नाहीसे होतील.
10न्यायी जेव्हा देवाने घेतलेला सूड पाहील तेव्हा तो आनंदित होईल;
तो आपले पाय दुष्टांच्या रक्तात धुईल.
म्हणून मनुष्य म्हणेल, “खरोखर न्यायी माणसांना त्यांचे प्रतिफळ आहे;
खरोखर पृथ्वीवर न्याय करणारा देव आहे. खरोखर आहे.”
11

Copyright information for MarULB